गदिमा नवनित
  • पळून गेलेल्या काळाच्या कानात,
    माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • आगगाडी
  • Aaggadi
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    झुकक झुक, धडाड् धाड्
    बॉम्बे -पूना, दौंड-मनमाड
    डाकघराचा डब्बा लाल
    पोती भरुनी घेई हमाल
    गार्डा, गार्डा सिग्नल पाड
    दाम पोचले, चढला माल
    उतरून गेले सर्व हमाल
    रुळारुळांच्या गुंतवळ्यातून
    काढ एंजिना रस्ता काढ
    मागे पडते स्टेशन, गाव
    सुटली गाडी ही भरधाव
    कसे लागले उलट पळाया
    वाटेवरचे झाडन् झाड
    नाकापुढली सगळी वाट
    येई बोगदा आणि घाट
    इवली इवली गाडी बघती
    आजूबाजूचे उंच पहाड


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems