गदिमा नवनित
  • कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात
    वर घालितो धपाटा,आत आधाराचा हात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • जय जवान, जय किसान
  • Jai Jawan Jai Kisan
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    एक सूर एक ताल, एक गाऊ विजयगान !
    जय जवान, जय किसान !!

    अखिल देश पाठीशी, ‘जवान’ व्हा रणी चला
    किसान होऊनी कसा, भूमि सस्य श्यामला
    यौवनास योग्य रे, शौर्य आणि स्वाभिमान
    जय जवान ।।१।।

    शत्रु मित्र जाणुनी, सावधान सर्वदा
    आपुल्या श्रमे करू, प्रसन्न देवी अन्नदा
    उभ्या जगात आपुली, सदैव उंच ताठ मान !
    जय जवान ।।२।।

    अजिक्य सैन्य आमुचे, गाजवी पराक्रमा
    भूमिदास दाखवी, निर्मितीत विक्रमा
    स्वतंत्र हिद देश हा, स्वतंत्र सिधु आसमान ।
    जय जवान ।।३।।


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems