वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
माहेर
Maher
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
नदी सागरा मिळता
पुन्हा येईना बाहेर,
अशी शहाण्यांची म्हण
नाही नदीला माहेर.
काय सांगु रे बाप्पांनो
तुम्ही आंधळ्याचे चेले,
नदी माहेराला जाते
म्हणूनीच जग चाले.
सारे जीवन नदीचे
घेतो पोटात सागर,
तरी तिला आठवतो
जन्म
दिलेला डोंगर.
डोंगराच्या मायेसाठी
रुप वाफेचे घेऊन,
नदी तरंगत जाते
पंख वार्याचे लावून.
पुन्हा होऊन लेकरु
नदी वाजाविते वाळा,
पान्हा फुटतो डोंगरा
आणि येतो पावसाळा.
गदिमा गौरव | Special Quotes
यशवंतराव चव्हाण
गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'