गदिमा नवनित
  • पद्मासमान जन्मे हे काव्य जीवनी या या जीवनात काव्ये, काव्यात जीवने या!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • काव्याची किंमत
  • Kavyachi Kimmat
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    साहित्याचा उरुस भरला नवसे गवसे जन जमले,
    सभेत बसल्या सौंदर्यास्तव हौशी डोळे आसुसले.

    व्यासपीठावर ठराव चढला काव्यांना द्या मोबदले,
    इकडे एका रसिक दृष्टिला सभेत काही सापडले.

    भावुक डोळे,चढत्या भुवया,किंचित कलती मान दिसे,
    सुबक जरीचा निळा चौकडा,आवृत्त यौवन आत हसे.

    उभार बांधा,मांसल खांदा,पदर त्यावरी लोळतसे,
    काळ्या कुरळ्या कचबंधाचा नाग हालता घे वळसे.

    नजरेलागी नजर मिळाली,मनात काही घुटमळले,
    नखाएवढ्या मंगळसूत्रे क्षणात पण ते अडखळले.

    दुरुन पाहता पाप न लागे आतिल मानस कुजबुजले,
    आणि नजिकच्या शेजार्‍्यासहि मस्त पाखरु दाखविले.

    म्हणे ऐकता काय ठरावा?बघा मदनिका दिसे कशी,
    अंगलटीला कसा लगटला चोपुन शालू बनारसी.

    कोण सिकंदर ज्याच्यासाठी रम्य रुप हे अवतरले,
    पोशाखाची रचना सुंदर काव्यच वाटे जुळवियले.

    शेजार्‍्याच्या चेहर्‍्यावरती हास्यरेघही नच उठली,
    साहित्याच्या सभेत अरसिक वाचा पुटपुटली.

    एक काव्य का संग्रह करुनी तीन पुस्तके मी विकली,
    तेंव्हा कोठे पत्नीने या उंची वस्त्रे पांघरली.


गदिमा गौरव | Special Quotes
  • पं.महादेवशास्त्री जोशी
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems