गदिमा नवनित
  • पळून गेलेल्या काळाच्या कानात,
    माझ्या गीतांची भिकबाळी डोलते आहे.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • पर्गती ?
  • Pargati
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    धानू शिरपती,
    कुठ कशाची झाली रं पर्गती?
    गाडी बी तीच
    गडी बी तेच
    बैल बी तेच
    कासरा त्योच
    सैल
    मग बदललं ते काय?
    बैलाचे पाय?
    उजव्या अंगाचा भादा बैल,
    डाव्या अंगाला आला
    पर,
    त्याने बदल रं काय झाला?
    आता बसनारांना वाटतंय
    जत्रा माघारी निघाली
    माझं म्हननं
    ही मजलच अवघड हाय
    हे वझं जिवापरीस जड हाय
    गाडी बी नवी बांधाय हुवी
    रस्ता बी नवा कराय होवा
    ताजीतवानी खोंडं जुपली
    त कुनाला ठावं
    जाईल गाडी सरळ
    पर हे कुनी करायचं?
    कसं करायचं?
    पयला गाडीवान म्हनायचा
    जल्दी जल्दी
    आताचा बी म्हनतोय
    जल्दी जल्दी
    वाट बदलत न्हाई
    बैल हालत नाही
    धानू शिरपती
    ही कसली गा क्रांती?


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems