गदिमांच्या कविता | Gadima Poems
 • वि.वा शिरवाडकर:
  माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
 • Box-C-28
 • प्रश्न
 • Prashna
 • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


 •  

  नवी अनुभूती
  नवी निर्मिती
  नवे वाङमय

  नवी कला
  नवे तंत्र
  नवे स्वातंत्र्य

  नवी डोकी,नवी अक्कल
  नव्या सुरुकुत्या
  नवे टक्कल

  जुन्या-नव्यांच्या
  मधले नवथर
  जुने होईतो टिकेल का?

  वाल्मीकीच्या दाढीचा केस


  (अति नव्या जमान्यात तरी)
  कधी काळी पिकेल का?


गदिमा गौरव | Special Quotes
 • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
  महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems