ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
झोपडीच्या झापाम्होरं
कसं चांदणं टिप्पूर
वार्यासंगं हेलावतो,
उभ्या चिंचेचा मोहोर
सभोंवार काळं रान,
गेलं दुधांत भिजून
रानवेलींची लेकरं,
त्यास चाटती निजून.
उगड्या गव्हाणीशीं
बैल करती रवंथ
करी रानाची राखण,
मोत्या जागत,पेंगत.
बाळा,दमून भागून
तुझं वडील झोपलं
नको किरकिर
झोप उगीच मोडल.