वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
माझा गांव
Maze Gaon
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
नजिक नाझरें श्रीधर कविंचे,नदी माणगंगा
नित्य नांदते खेडे माझें धरुनि संतसंगा
तिळही नाही खेड्याला या पहिला इतिहास
शिल्पकलेची ताम्रपटाची कशास मग आस?
इथे न नांदे शिवशाहीचा संबधीं वंश
गर्व-सर्प या करुं न शकला ओझरता दंश!
निळा जलाशय नाहीं येथे,नाहीं उद्यान
अन्नासाठीं
मात्र हिरवळे भंवतीचे रान!
अधुनिकतेचा नाहीं येथिल वास्तूंना वास
धाब्यावरती घरें बसविती उन्हा-पावसास
कष्टासाठीं दिवस येथला येतो उदयास
रात येतसे थकलेल्यांना निद्रा देण्यास
जाति जमाती इथें जन्मती सुखें नांदण्यास
पिरास करतो नवस मराठा,मियां मारुतीस
मायबोलिहुन नाहीं दुसर्या भाषेला वाव
व्याकरणाविण इथें बोलती ह्रदयाचे भाव!
नडित नाहीं अज्ञनांना पदोपदीं ज्ञान
अनुभव आणिक वार्धक्याला मात्र इथें मान
न्यायासाठी पांच मुखांचा परमेश्वर बोले,
गावांमागुन इथें व्यक्तिची निर्भयता चाले.
अवजड मोटा खिलार खोंडे सहज ओढतात
अवजड ओझें संसाराचे तरुण वाहतात!
थकले नंदी अलगद नेती खडकांतुन गाडी
म्हातार्यांचा अनुभव नेई पुढें गांवगाडी
सातार्याचे पोर मात्र हे घडतांना क्रांति
उघड दाखवी भूमिगाच्या कार्यावर प्रीति
दिला आसरा उरीं कितीदां मर्द जवानांना
भूमीवर या स्वैर हिंडले भूमीगत नाना
नसौ नाहिं तर या खेड्याला पहिला इतिहास
सुपूत त्याचे उजळूं आम्ही नव्या भविष्यास!
फडकत राहो असाच येथें झेंडा तिनरंगा
नित्य नांदो खेडें माझें धरुन संतसंगा!
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.