गदिमा नवनित
  • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • मृग
  • Mrug
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    माऊलीच्या दुग्धापरी
    आले मृगाचे तुषार,
    भुकेजल्या तान्ह्यासम
    तोंड पसरी शिवार,

    तुकोबाच्या अभंगाला
    मंद चिपळ्यांची साथ,
    भरारतो रानवारा
    तसा झाडाझुडपांत!

    पिऊनिया रानवारा
    खोंड धांवे वारेमाप,
    येतां मातीचा सुगंध
    स्तब्ध झाले आपोआप,

    अवखळ बाळांपरी
    पक्षी खेळती मातींत,
    उभारल्या पंखावरी
    थेंब टपोरे झेलीत!

    धारा वर्षतां वरुन
    बैल वशिंड हालवी
    अवेळींच फुटे पान्हा
    गाय वत्साला बोलवी!

    गांवानेंच उंच केला-
    हात दैवी प्रसादास,
    भिजुनिया चिंब झाला
    गांव देवीचा कळस.

    निसर्गानें दिलें धन-
    -द्यावें दुसर्‍यां, जाणुनी,
    झालीं छप्परें उदार
    आल्या पागोळ्या अंगणी!

    काळ्यामाळ्या करितात
    बाळें उघडीं नागडीं,
    सांचलेल्या पाण्यामधीं
    नाचतात घडीघडीं!

    नांगरली रानवाट
    आतां फुलेल रोपांनी
    पान लागे चवदार
    शेतकर्‍यांना चिंतनीं!

    स्नान झालें धरणीचें
    पडे सोन्याचा प्रकाश!
    आतां बसेल माऊली
    अन्नब्रम्हाच्या पूजेस!


गदिमा गौरव | Special Quotes
  • पं.महादेवशास्त्री जोशी
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems