गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • परिस्फोट
  • Parisphot
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    गीत हवे का गीत?
    एका मोलें विकतों घ्या रे विरह आणखी प्रीत

    गिर्‍हाइकाच्या लहरीखातर
    कांतुनि मी आणियलें अक्षर
    सुरेख केल्या बघा बाहुल्या वरी बांधिली फीत

    नीटस गोंडस,वजनीं हलक्या
    मुक्या तरीहि दिसति बोलक्या
    नयनीं यांच्या भाव कोरिले जे सर्वां माहीत

    हंसर्‍या,रडव्या,सुप्त,खेळत्या
    कळसूत्रीं कुणि सहज नाचत्या
    भडक घातले वेष,सहज जे करिती जन मोहीत

    कोण हंसे तें दबल्या ओठी!
    सौदा करितों पोटासाठी
    रस्तोरस्तीं फिरुनि पोटच्या कन्या नाहिं विकीत!

    हंसणारांनो,वेळ काढुनी
    या गरिबांच्या प्रसंन्न सदनीं
    अरुणम्य त्या बघाल लेकी,बघाल त्यांची रीत

    उरांत माझ्या अग्नी लपला
    पोटीं आल्या समूर्त चपला
    असेल साहस तर या गेहीं,होउं नका विचलीत

    दिसतो तुम्हां तो मी नाहीं
    कसले येतां माझ्या गही कीं गेहीं
    उन्मेषाच्या वनीं नांदतों,तेजाच्या जाळींत

    तेथें येतिल ते तर ज्ञानी
    तसें म्हणावें तुम्हांस कोणी?
    फिरते छाया पथांत माझी,तीच बसा न्याहळीत

    मी हंसण्यानें तुमच्या हंसलों
    बोलुं नये तें गूज बोललों
    तुमच्या दारीं रोजच बसणें माल मला खपवीत


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems