गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • दिसे ही सातार्‍याची तर्‍हा
  • Dise Hi Sataryachi Tarha
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    घोळ निर्‍यांचा पदी अडखळे,जलद चालणे जरा
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा

    तुरुतुरु चालसी नारी,चवडयांवरी ग
    उमटती फराटे पाउल वाटेवरी ग
    येतसे कुणी का मागुन मागावरी ग?
    पदराआडच अरधा मुरधा लपे तुझा चेहरा
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा

    डोळ्यांत बावळा अजुन नेणतेपणा


    भाबड्या मुखावर गोंदवणाच्या कुणा ग
    डोलतो उरावर मदनाचा पाळणा ग
    पाळण्यातले पोर उसवितें चोळीचा कोपरा
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा

    सावळी तरी तू गोर्‍याहुन गोमटी ग
    पट्ट्यात चांदिच्या कशी बसविशी कटी ग?
    थोराड हाड या मुलखाचे शेवटी ग
    बुलंद दिसते तुझी इमारत,ठीक चिर्‍यावर चिरा
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा

    जाहली तुला ना चवदा वर्षे पुरी ग
    पोवळी उमटली दोन्ही गालांवरी ग
    इतक्यांत निघे कां मुरमांतुन बाजरी ग?
    माहित नाही इष्क तुला पण भुइवरल्या पांखरा!
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा

    असतील ओठी तव अजुन उखाणे म्हणी ग
    तुज कशी कळावी रंगाची लावणी ग
    कां उगाच मिटते माझी मग पापणी ग
    खरीच मोठी होशिल तेव्हा भेटच या शाहिरा
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा

    राहु दे तोवंरी असेंच निरसे हंसे ग
    मी जपून ठेविन आंबट माझे पिसे ग
    मंथनी पहा मग लोणी निघतें कसें ग
    आवडिप्रीतिनें तूंच पसर त्या लोणआयावर शर्करा
    दिसे ही सातार्‍याची तर्‍हा


गदिमा गौरव | Special Quotes
  • पं.महादेवशास्त्री जोशी
    गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे संयुक्तिक ठरेल..
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems