गदिमा नवनित
  • लळा-जिव्हाळा शब्दच खोटे,मासा माशा खाई,कुणी कुणाचे नाही राजा,कुणी कुणाचे नाही!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • दरडीवर
  • Daradiwar
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    डुइवर घागर,हाती कळसी,अजब तुझा ग थाट
    डोळं लववुन चाल जराशी,उभी चढणिची वाट

    शेवाळानं झालं निसरडं संभाळ कलता तोल
    उभी राहुनी माझ्यासंग चार अक्षरं बोल
    लयी दिसांनी आज गवसली एकांतीची गांठ!

    मुरकी मारुन गिरकीसरशी असं काय जावं?
    बरा थडकला खडक पाउलां,ठोकरलं जोडवं
    पदर घसरता,मनांत भरला तुझा मराठी घाट!

    दमांत जाऊ नको ठेचळुन कणखर माझं मन
    बहिरि ससाण्यापरी झडपुनी नेइन ग उचलुन
    पुरं पांखरा खुळी करामत,थांबच बिनबोभाट!

    कुळवंताची बाळ सये तूं,मी मोठ्याचा पोर
    खोडीसाठी माझ्या पडतिल उगा इरेला थोर
    डोळ्यांनी तरि सांग आंतलं नकोस फिरवू पाठ!

    आडमुठ्याला आतां कळला लाजेचा हा खेळ
    चला म्हणालिस,आज उमगला दोन मनांचा मेळ

    आतां भेटी वैशाकांतच सरतां आंतर्पाट
    डोळं लववुन चाल जराशी उभी चढाची वाट!


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems