वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
मी तो भारलेले झाड!
Mi To Bharalele Zad
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
अजाणतेपणी केंव्हा माता घाली बाळगुटी
बीज धर्माच्या द्रुमाचे कण कण गेले पोटी
छंद जाणतेपणीचा,तीर्थे काव्याची धुंडिली
कोण्या एका भाग्यवेळी पूजा रामाची मांडली
देव वाणीतले ओज शीतळले माझ्या ओठी
वाल्मिकीच्या भास्कराचे होई चांदणे मराठी
झंकाराती कंठ वीणा,येती चांदण्याला सूर
भाव माधुर्याला येई,महाराष्ट्री
महापूर
चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.