गदिमा नवनित
  • दुःखीच साह्य होतो दुःखांत दुःखिताला
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांच्या कविता | Gadima Poems
  • वि.वा शिरवाडकर:
    माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
  • Box-C-28
  • जन्म-मृत्यू
  • Janma Mrutyu
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    मागता जे ना मिळे,टाळल्याने ना टळे,
    जीवमात्रा सोडिना हे, जन्म-मृत्यूचे जुळे.
    जन्म असतो अंध अगदी,
    मृत्यूला आहेत डोळे.
    डोळसाचा हात धरुनी,
    वाट चाले आंधळे.
    जन्मल्या जीवास वाटे,
    त्यास दिसते ते खरे.
    आंधळ्याची स्वप्नमाला,
    सत्य त्याते साजिरे.
    भास स्वप्नातील काही
    सुखवीती त्याच्या मना
    त्त्याच मनातील दःखे
    जाळीती त्या जीवना
    प्रेम,नाती,लाभ,हानी,
    कीर्तिसुद्धा कल्पना.
    देव आणि दैव याही,
    सत्य ना,संकल्पना.
    सोडुनिया हात मृत्यू,सहज केव्हा गुप्त होई,
    जीवनाचे शून्य अंती, होऊनी शून्यांश राही.
    ----------------------------