वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात
Kumbhara Sarakha Guru Nahi Re Jagat
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात
वर घालितो धपाटा,आत आधाराचा हात.
आधी तुडवी तुडवी मग हाते कुरवाळी
ओल्या मातीच्या गोळयाला येई आकृती वेगळी
घट जाती थोराघरी,घट जाती राऊळात.
कुणी चढून बसतो गावगौरीच्या मस्तकी
कुणी मद्यपात्र होतो रावराजाच्या हस्तकी
आव्यातली
आग नाही पुन्हा कुणी आठवत.
कुणी पूजेचा कलश,कोणी गोरसाचा माठ
देता आकार गुरुने,जयाची त्याला लाभे वाट
घट पावती प्रतीष्ठा गुरु राहतो अज्ञात.
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.