वि.वा शिरवाडकर: माडगूळकरांची कविता मराठी मातीतून उगवलेली,अस्सल मराठी रुपाची,कलदार शैलीची आणि कसदार आशयाची आहे.शब्दांच्या आणि छंदाच्या राज्यातील तर ते स्वामीच होते.
Box-C-28
आंधळ्याचा आशीर्वाद
Andhalyancha Ashirwad
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
श्रावणबाळा,कावड खाली ठेव
आम्हाला नको तीर्थयात्रा,
नको देव.
सू्र्य आणायला जाणार आहेत ना
तुझ्या वयाची मुले?
त्यांच्या जथ्यात जा.
अरे,
आम्ही सूर्य कधी पाहिलाच नाही
त्याची फक्त सूक्ते पाठ केली.
तू जा.
आमची यात्रा येथेच संपू दे.
अर्धपोट्याकडून अन्न
नको आम्हाला.
तृषार्ताकडचे पाणीही नको.
अवघेच तहानेले आहेत
तर
मरताना आमच्या मुखी
गंगा कशाला?
नको आणूस पाणी,
आमच्या तहानेसाठी.
सत्ताधार्याच्या बाणाचा बळी होऊ
नकोस.
त्यापेक्षा त्याच्याशीच
शरसंधान कर.
रामायण पुन्हा घडणार नाही
याविषयी शंका नाही आम्हाला.
तू आपला जा.
ही बघ आरोळी उठते आहे.
दिसत नसले
तरी ऐकू येते आम्हाला.
तू जा,
आमची कावड इथेच ठेव.
गदिमा गौरव | Special Quotes
यशवंतराव चव्हाण
गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'