नाच रे मोरा
नाच रे मोरा, आंब्याच्या वनात
नाच रे मोरा नाच!
ढगांशी वारा झुंजला रे
काळा काळा कापूस पिजला रे
आता तुझी पाळी
वीज देते टाळी
फुलव पिसारा नाच
झर झर धार झरली रे
झाडांची भिजली इरली रे
पावसात
न्हाऊ
काहीतरी गाऊ
करून पुकारा नाच
थेंब थेंब तळ्यात नाचती रे
टपटप पानात वाजती रे
पावसाच्या रेघात
खेळ खेळू दोघात
निळ्या सौंगड्या नाच
पावसाची रिमझिम थांबली रे
तुझी माझी जोडी जमली रे
आकाशात छान छान
सात रंगी कमान
कमानीखाली त्या नाच
गदिमा गौरव | Special Quotes
यशवंतराव चव्हाण
गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'