इवल्या इवल्याशा
टिकल्या टिकल्यांचे
देवाचे घर बाई उंचावरी
ऐक, मजा तर ऐक खरी !
निळी निळी वाट
निळे निळे घाट
निळ्या निळ्या पाण्याचे झुळुझुळु पाट
निळ्या निळ्या डोंगरात निळी निळी दरी
चांदीच्या झाडांना सोन्याची पाने
सोनेरी मैनेचे, सोनेरी गाणे
सोन्याची
केळी, सोन्याचा पेरू
सोनेरी आंब्याला, सोनेरी कैरी!
देवाच्या घरात गुलाबाची लादी
मऊ मऊ ढगांची अंथरली गादी
चांदण्याची भांडी चांदण्याची हंडी
चांदोबाचा दिवा मोठा लावला वरी
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....