गदिमा नवनित
  • अंत उन्नतीचा पतनीं होइ या जगांत
    सर्व संग्रहाचा वत्सा, नाश हाच अंत
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • गोरी गोरी पान
  • Gori Gori Pan
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    गोरी गोरी पान, फुलासारखी छान
    दादा मला एक वहिनी आण
    गोर्या गोर्या वहिनीला, अंधाराची साडी
    अंधाराच्या साडीला, चांदण्याची खडी
    चांदण्याच्या खडीला, बिजलीचा वाण
    वहिनीला आणायला, चांदोबाची गाडी
    चांदोबाच्या गाडीला, हरणाची जोडी
    हरणाची जोडी तुडवी, गुलाबाचे रान
    वहिनीशी गट्टी होता, तुला दोन थापा
    तुला दोन थापा, तिला साखरेचा पापा
    बाहुल्यांशी खेळताना दोघे आम्ही सान


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems