गदिमा नवनित
  • सार्‍या जगासाठी द्यावा गुरुदेवा एक वर
    जीव जीव सुखी व्हावा,स्वर्ग यावा पृथ्वीवर!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • झुक झुक झुक झुक आगीनगाडी
  • Zuk Zuk Zuk Zuk Agingadi
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    झुक झुक झुक झुक आगीनगाडी
    धुरांच्या रेखा हवेत काढी
    पळती झाडे पाहूया, मामाच्या गावाला जाऊया
    मामाचा गाव मोठा, सोन्यांचांदीच्या पेठा
    शोभा पाहुनी घेऊया, मामाच्या गावाला जाऊया
    मामाची बायको गोरटी, म्हणेल कुठली पोरटी
    भाच्यांची नावे सांगूया, मामाच्या गावाला जाऊया
    मामाची बायको सुगरण, रोज रोज पोळी शिकरण
    गुलाबजामन खाऊया, मामाच्या गावाला जाऊया
    मामा मोठा तालेवार, रेशीम घेईल हजार वार
    कोट विजारी लेऊया, मामाच्या गावाला जाऊया