गदिमा नवनित
  • या वस्त्रांते विणतो कोण
    एकसारखी नसती दोन
    कुणा न दिसले त्रिखंडात त्या, हात विणकर्‍याचे
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा
  • Shepatiwalya Pranyanchi
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    शिक्षिका : शेपटीवाल्या प्राण्यांची पूर्वी भरली सभा,
    पोपट होता सभापती मधोमध उभा.
    पोपट म्हणाला, ‘‘मित्रांनो, देवाघरची
    लूट! तुम्हां-आम्हां सर्वांना एक एक
    शेपूट या शेपटाचे कराल काय ?’’
    एक मूल : गाय म्हणाली, ‘‘अश्शा अश्शा
    शेपटाने मी मारीन माश्या’’
    दुसरे मूल : घोडा म्हणाला, ‘‘ध्यानात धरीन,
    ध्यानात धरीन. मीही माझ्या शेपटीने
    असेच करीन, असेच करीन,’’
    तिसरे मूल : कुत्रा म्हणाला, ‘‘खुशीत येईन
    तेव्हा शेपूट हलवित राहीन.’’
    चौथे मूल : मांजरी म्हणाली, ‘‘नाही ग बाई
    कुत्र्यासारखे माझे मुळीच नाही, खूप
    खूप रागवीन तेव्हा शेपूट फुगवीन.’’
    पाचवे मूल : खार म्हणाली, ‘‘पडेल थंडी तेव्हा
    माझ्या शेपटीची मलाच बंडी.’’
    सहावे मूल : माकड म्हणाले, ‘‘कधी वर कधी
    बुडी, शेपटीवर मी मारीन उडी.’’
    सातवे मूल : मासा म्हणाला, ‘‘शेपूट म्हणजे
    दोन हात, पोहत राहीन प्रवाहात.’’
    आठवे मूल : कांगारू म्हणाले, ‘‘माझे काय ?’’
    शिक्षिका : ‘‘तुझे काय ? हा हा हा! शेपूट
    म्हणजे पाचवा पाय.’’
    सर्वजण : ‘‘शेपूट म्हणजे पाचवा पाय.’’
    शिक्षिका : मोर म्हणाला.
    शेपटीवाल्या
    प्राण्यांची
    नववे मूल : मोर म्हणाला ‘‘पीस पीस
    फुलवून धरीन
    पावसाळ्यात मी नाच
    करीन.’’
    शिक्षिका : पोपट म्हणाला, ‘‘छान
    छान ! देवाच्या देणगीचा
    ठेवा मान. आपुल्या
    शेपटाचा उपयोग करा.’’
    मुले : ‘‘नाहीतर काय होईल?’’
    शिक्षिका : ‘‘दोन पायाच्या माणसागत
    आपले शेपूट
    झडून जाईल.’’


गदिमा गौरव | Special Quotes
  • लेखक पु.भा.भावे:
    वास्तवतेतील गूढत्व व साधुत्व पाहावयासही माणसापाशी एक दृष्टी असावी लागते.माडगूळकरांचे पाशी ही दुर्मिळ दृष्टी आहे.ते नुसते आकाशाकडे पाहत नाहींत तर आकाशतत्त्वाकडे पाहतात.ह्या तात्त्विक दृष्टीनेच त्यांना आशयसंपन्न कथाचित्रे काढण्याचे सामर्थ्य दिले-अगदी दिवाकर कृष्णांपासून चालत आलेली चांगल्या कथांची परंपरा आज श्री.माडगूळकर चालवीत आहेत.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems