ती : नीज छकुल्या सोनुल्या रेऽऽ नीज छकुल्या सोनुल्या
चांदण्याची करून शय्या झोपी गेल्या सावल्या
शांत झाले नगर सारे, साद अवघे झोपले
फार झाली रात राजा, झोपली पाने, फुले
वारियाच्या येरझारा पार आता थांबल्या
नीज छकुल्या सोनुल्या
तो : एक जागी रातराणी फुलत राही
अंगणी
ती : एक जागा चंद्र आहे
तो : आणि त्याची चांदणी
ती : एक जननी जागते अन जोजविते तान्हुल्या
नीज छकुल्या सोनुल्या
गदिमा गौरव | Special Quotes
पं.महादेवशास्त्री जोशी
गीतरामायण म्हणजे आदर्शाचा उत्तुंग पुतळा म्हटला, तर गीतगोपाल म्हणजे त्याच्या भोवतीच बहरलेले कुंजवन म्हणता येईल.तिथे प्रणाम करायचा,इथे विहार!गीतरामायणाची वाणी ही भारलेली आहे.तर गीतगोपालाची वाणी झंकारलेली आहे.गीतरामायण हा मराठी शारदेच्या मखरात बसतांना घालायचा मुकुट तर गीतगोपाल हा तिचा हळदीकुंकुवाला जातांना गळ्यात रुळवायचा रत्नहार म्हणणे
संयुक्तिक ठरेल..