देव जेवला हो, देव जेवला
ह्या ह्या डोळ्यांनी, मी पाहिला!
कमरेवरचा काढुनी हात
कालविला दूधभात
मोडी मुरडीचा कानवला
देव जेवला हो, देव जेवला
ओरपली त्याने खीर
तोंडी लाविली कोशिबीर
भुरका साराचा मारीला
देव जेवला हो, देव जेवला
गदिमा गौरव | Special Quotes
यशवंतराव चव्हाण
गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'