गदिमा नवनित
  • कालपुरुषा तु स्वत: थकशील,थेरडा होशील पण,आम्हाला म्हातारपण देणे कक्षेबाहेर आहे तुझ्या.
    आम्ही लढतच राहु.हे आव्हान घे माझे-एका कलाकाराचे!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • ससा उपजला कसा
  • Sasa Upajala Kasa
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बसा मुलांनो बसा, सांगतो ससा उपजला कसा
    आई होती एक, तियेचा एक लाडका लेक
    त्याने केली प्रीत, आगळी जगाहून विपरित
    कुणा मुलीचा ध्यास लागला त्याला रात्रंदिसा
    त्या मुलीचा बोल, तयाला पृथ्वीहून अनमोल
    तिने इच्छिले काय, मुलाने जिती चिरावी माय
    आणि तियेचे काळीज आणून तिचा भरावा पसा
    आई म्हणाली, बाळ, सखीचा शब्द आपुल्या पाळ
    तुला लाभते प्रीत, तियेस्तव मरेन मी निश्चित
    कट्यार घे अन् चीर सुखाने उरोभाग तू कसा
    काळीज असले थोर तयाला कापुन देई पोर
    लेकासाठी माय, सुखाने जिवंत मरुनी जाय
    देवलोकी ते गेले, काळीज सांडीत वत्सल रसा,
    देव म्हणाला यास, घालणे भाग नव्या जन्मास
    औक्ष राहिले अजुन, तरी हे आले आपणहून
    ते आईचे काळीज घेऊन, देवे धाडिला ससा
    हृदयासम कोवळा, सजीव हा आईचा कळवळा
    आवडती या मुले, गोजिरी देवाघरची फुले
    स्पर्श तयाचा बघा आईच्या हातासम गोडसा


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems