गदिमा नवनित
  • चंद्र भारल्या जीवाला,नाही कशाचीच चाड
    मला कशाला मोजता,मी तो भारलेले झाड
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • इवल्या इवल्या वाळूचे
  • Evalya Evalya Waluche
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    इवल्या इवल्या वाळूचे
    ते तर घरकुल बाळूचे
    बाळू होता बोटभर
    झोप घेई पोटभर
    वरती बाळू
    खाली वाळू
    बाळू म्हणे की, इथेच लोळू....
    उन्हात तापू लागे वाळू
    बाळूला ती लागे पोळू
    या इवल्याशा खोपेत
    बाळू रडला झोपेत
    एक बन होतं वेळूचं
    त्यात घर होतं साळूचं
    साळू मोठी मायाळू
    वेळू लागे आंदोळू
    त्या पंख्याच्या वार्यात
    बाळू निजला तोर्यात
    एकदा पाऊस लागे वोळू
    भिजली वाळू, भिजले वेळू
    नदीस येऊ लागे पूर
    बाळू आपला डाराडूर
    भुरकन खाली आली साळू
    वाळूचे घर
    आणि म्हणाली, ‘‘उठ रे बाळू’’
    बाळू निजला, जैसा धोंडा
    तोवर आला मोठ्ठा लाेंढा
    साळूने मग केले काय
    चोचीत धरला त्याचा पाय
    वेळू वरती नेले उंच
    आणि मांडला नवा प्रपंच
    बाळूचे घरकुल वाहून गेले
    साळूचे घरटे राहून गेले
    साळू आहे मायाळू
    बाळू बेटा झोपाळू
    वाळूवाणी वेळूवर
    ताणून देतो खालीवर
    साळू म्हणते, गाऊ खेळू
    बाळू म्हणतो, इथेच लोळू
    आमची गोष्ट आखूड
    संभ्याच्या पाठीत लाकूड


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems