चांदोबा चांदोबा
चांदोबा चांदोबा भागलास का ?
निबोणीच्या झाडामागे लपलास का ?
निबोणीचे झाड करवंदी
मामाचा वाडा चिरेबंदी
आई बाबांवर रुसलास का ?
असाच एकटा बसलास का?
आता तरी परतून जाशील का ?
दूध आणि शेवया खाशील का ?
आई बिचारी
रडत बसेल
बाबांचा पारा चढत असेल
असाच उपाशी राहशील का ?
बाबांची बोलणी खाशील का ?
चांदोबा चांदोबा
कुठे रे गेलास ?
दिसता दिसता
गडप झालास
हाकेला ओ माझ्या देशील का ?
पुन्हा कधी आम्हाला दिसशील का ?
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....