गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
फुगडी खेळू ग फिरकीची
Phugadi Khelu Ga Phirkichi
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या ग गिरकीची !
फिरतील वेण्या गर गर गर
करतील पैंजण थर थर थर
भुईवर चित्रं ग कमळाची
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची !
गोरा गोरा एक मनोरा
फिरता तरीही उभा भोवरा
सीमा झाली
ग हौसेची
फुगडी खेळू ग फिरकीची
तिरक्या तिरक्या ग गिरकीची !