मैना राणी चतुर शहाणी
सांगे गोड कहाणी
कहाणीत त्या पशुपक्षांना
अवगत असते वाणी.....
सिह वनाचा असतो राजा
घेती त्याची चिठ्ठी
वाघ वागतो भिऊन त्याला
गुडघे टेकी हत्ती
अती चतुर कोल्हा कोणी
सिहा पाजी पाणी
सांगे गोड कहाणी......
मैना राणी
कोल्ह्याचाही काढे काटा
कोणी करकोचा
घरी बोलावून पाणउतारा
करी पाहुण्याचा
कडी वरी त्या कडी करूनिया
टोला कोल्हा हाणी
सांगे गोड कहाणी......
शाल म्हणुनी खाल पांघरे
गाढव वाघाची
त्यास पाहता झोप उडाली
जंगल भागाची
एक कोंबडा उघडकीस पण
ढोंगच त्याचे आणी
सांगे गोड कहाणी.....
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....