ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
हलकेच कळ्यांनो उमला, लागते झोप राजाला ।
पाकळीच्या आवाजाने, येईल जाग ना त्याला! ।।धृ.।।
कोटरांतल्या मैनाबाई
तिथेच थोडी थबकुन राही
ललतराग गाउनी वेडे, जागवू नको छकुल्याला ।।१।।
फिरत्या पवना थांब पळभरी
उषे, आपुला पदर सावरी
क्षितिजाच्या या उंबरठ्यावर, वाजवू नको पाउला।।२।।
दश-दिशांनो,
गुलाल फेका
अरुण-रथाला पळभर रोखा
मावळत्यांचे हार घालुनी, स्वागतात रमवा त्याला ।।३।।
हलकेच कळ्ङ्मांनो उङ्खला !