आई व्हावी मुलगी माझी
मी आईची व्हावे आई
नको बोलणी खारट आंबट
विटले विटले बाई
सूर्यापूर्वी उठा सकाळी
चहाऐवजी दूध कपाळी
अंघोळीच्या वेळी चोळा
डोईस शिकेकाई
केस कोरडे कर ग पोरी
सात हात त्या जटा विचरी
नको पावडर दवडू बाई
कोकलते ही आई
शाळेनंतर पुन्हा शिकवणी
रोजचीच ती फुका जाचणी
लहान भावादेखत अगदी
कान पकडते बाई
आई व्हावी
मुलगी माझी...
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.