गदिमा नवनित
  • उचललेस तू मीठ मुठभर,साम्राज्याचा खचला पाया!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • सांगा ना हो आजोबा
  • Sanga Naho Ajoba
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    सांगा ना हो आजोबा
    कोण असतो चांदोबा ?
    पंख नाहीत, पाय नाहीत
    फिरतो कसा कुणाला माहीत.
    बघावे तेव्हा खुषीत असतो
    हसत असतो वेडोबा.
    आजी म्हणते ‘चंद्र’ देव.
    रागावेल तो, आधी जेव.
    नाहीतर, तुझा दुधभात,
    पळवून नेतील बोकोबा.
    ‘चांदूमामा’ म्हणते आई,
    घरी कधी तो येत नाही
    असला कसला भाऊ तिचा हा
    उंचावरचा शहाणोबा.
    बाबा म्हणतात ‘कळेल कळेल
    तुझे उत्तर तुला मिळेल.
    मोठा हो, शाळा शीक
    आजच कसला खोळंबा ?’
    अधांतरी हा फिरतो गोल
    त्याला कसले देता मोल?
    चांद म्हणजे माती दगड,
    बडबड करीती दादोबा.
    कोण असतो चांदोबा


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
    महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems