गदिमा नवनित
  • हाती नाही बळ
    दारी नाही आड
    त्याने फुलझाड
    लाऊ नये
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • चंदाराणी
  • Chandarani Chandarani
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    चंदाराणी
    चंदाराणी, चंदाराणी, का गं दिसतेस थकल्यावाणी ?
    शाळा ते घर, घर ते शाळा, आम्हा येतो कंटाळा
    रात्रभर तू चाल चालसी, दिवसा तरी मग कोठे निजसी ?
    वारा, वादळ छप्पन वेळा, थारा नाही आभाळा
    कसा गडे तू तोल राखिसी, पुढती पुढती पाय टाकिशी
    काठी देखिल नसते हाती, थोडी नाही विश्रांती
    चढसी कैसी कशी उतरसी, निळ्या डोंगरी अखड फिरशी
    वाडा, घरकुल, घरटे नाही, आई नाही, अंगाई
    म्हणुनिच का तू अवचित दडसी, लिबामागे जाऊन रडसी


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems