गदिमा नवनित
  • या वस्त्रांते विणतो कोण?,एकसारखी नसती दोन
    कुणा न दिसले त्रिखंडात त्या हात विणकर्‍याचे
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • दूध नको पाजू हरीला
  • Doodh Nako Paju Harila
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    दूध नको पाजू हरीला
    दूद नको पाज्यू हलीला काल्या कपिलेचे
    काला या मनती आई ग, पोल गुलाक्याचे
    तूच घेउनी पदलाखाली
    पाजत जा या शांज-शकाली
    तुजियाशम गोले, होउदे लूप शोनुल्याचे
    तूही गोली, मीहि गोला
    काला का हा किश्न एकला?
    लावु नको तित्ती, नको ग बोत काजलाचे
    थेउ नको ग याच्यापाशी
    वाल्यामधल्या काल्या दाशी
    देउ नको याला, नहाया पानी यमुनेचे
    पालन्यात तू याच्या घाली
    फुले गोजिली चाप्यावलली
    लावित जा अंगा, पांघले गंद चंदनाचे
    नकोश निजवू या अंधाली
    दिवे थेव ग उशास लात्ली
    दावु नको याला कधीही खेल शावल्यांचे
    नको दाखवू, नको बोलवू
    झाडावलचे काले काऊ
    हंश याश दावी, शाजिले धवल्या पंखांचे
    हंशाशंगे याश खेलुदे
    चांदाशंगे गोथ्थ बोलुदे
    ल्हाउ देत भवती, थवेही गौल-गौलनींचे
    मथुलेहून तू आन चिताली
    गोली कल ही मूल्ती काली
    हशशी का बाई, कलेना कालन हशन्याचे?


गदिमा गौरव | Special Quotes
  • ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
    गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते तेच छंदासह....
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems