गोरी बाहुली कुठुन आली
कुशीमध्ये आईच्या ही कशी शिरली
झगा ना साडी तश्शी नागडी
चड्डीदेखील कशी हिने नाही घातली
उताणी पडे तशीच रडे
डोळ्यामध्ये हिच्या ओल्या निळाचे खडे
पुशी ही धीट गालीचे तीट
कुठे बाई ठेवावी ही जपुनी नीट
कोण्या दुकानी होती
ही राणी
पेटीविना तरी हिला आणली कोणी
छान रेखिले नाक डोळुले
लावयाचे केस हिला पार राहिले
आई ग आई मला ही देई
बदल्यात माझी सारी खेळणी घेई
हत्ती नी घोडे, कुत्री, माकडे
सिनेमाची पेटीसुद्धा देईन गडे
पोर लाघवी मला ही हवी
हवीतर बाबांकडे माग तू नवी.
गोरी बाहुली
कुठुन आली
गदिमा गौरव | Special Quotes
ग.दि.माडगूळकर(यवतमाळ,साहित्य संमेलनातील भाषणातून)
गीत गायले जाते एवढया अपराधासाठी त्याच्या अंगावरची कवित्वाची भूषणे काढून कशासाठी घ्यायची? काव्यहीन गीते लिहिली जातात,तशी काव्यहीन कविताही पुष्कळ असते.पण छंदात रचलेली एखादी कविता कोणी तालस्वरावर गायली तर तिच्यातील कवित्व नाहीसे झाले असे कसे? माझ्यासारख्या एकाद्या कविला काव्य स्फुरते
तेच छंदासह....