गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
अंगाई राजकुमारी
Angai Rajkumari
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
अंगाई, अंगाई राजकुमारी
अंगाई, अंगाई राजकुमारी
शांत झोपली दुनिया सारी !
आकाशीच्या पाळण्यात
पगुळली चंदाराणी
गुणगुणे वनदेवी
तिला गोड गाणी
किरणांच्या गुंफणीची झुलवित दोरी !
अंगाई, अंगाई राजकुमारी !
हिरवळीच्या बिछान्यात
रानफुले पेंगतात
मूककळ्या झोपी गेल्या लतिकांच्या अंकावरी !
अंगाई, अंगाई राजकुमारी
नाचविशी का हात सानुले
देवदूत का कुणी पातले ?
स्वप्न नवे का तुला आणिले ?
हसू म्हणुनी का गालावरी?
अंगाई, अंगाई राजकुमारी