गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • बकुळीचं झाड झरलं गं !
  • Bakulicha Zad Zarala Ga
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बकुळीचं झाड झरलं गं
    फुलांनी अंगण भरलं ग
    त्या बाई बकुळीत नाचू या
    तार्यांची गीते वाचू या
    रात निम्मी ग, चांद निम्मा
    खेळू झिम्मा ग, खेळू झिम्मा
    तालात पावलं पडती ग
    लयीची कमान चढती ग
    त्या बाई कमानीत आनंद
    लुटुनी घ्यावा

    स्वच्छंद
    द्यावा निम्मा ग, घ्यावा निम्मा
    खेळू झिम्मा ग, खेळू झिम्मा !


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems