आवडती भारी मला माझे आजोबा!
पाय त्यांचे थकलेले
गुडघ्यांत वाकलेले
केस सारे पिकलेले
ओटीवर गाती गीता माझे आजोबा!
नातवंडा बोलावून
घोगर्याशा आवाजानं
सांगती ग रामायण
मोबदला घेती पापा माझे आजोबा!
रागेजता बाबा-आई
आजोबांना माया येई
जवळी ते घेती बाई
कुटलेला विडा देती माझे आजोबा!
खोडी करी खोडकर
आजोबांची शिक्षा थोर
उन्हामध्ये त्यांचे घर
पोरांसंगे पोर होती माझे आजोबा!
गदिमा गौरव | Special Quotes
कविवर्य कुसुमाग्रज (गदिमा गेले तेव्हा)
महाराष्ट्र सरस्वतीचा लाडका पुत्र काळाने हिरावुन नेला.माडगूळकरांच्या निधनाने मराठी साहित्यातील उत्तम संस्कार मावळला.आणि एक सुंदर संगीत हरपले.विविध रसांवर विलक्षण प्रभुत्व करणारा त्यांच्या सारखा कवी अलीकडच्या काळांत झाला नाही.गीतरामायणाने माडगूळकर चिरंजीव झाले पण मराठीतील विविध रसांचे आणि कवितेतील अपूर्व चैतन्य गेले.