गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
टाळ्यांचे गाणे
Talyanche Gane
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
दे टाळी ग घे टाळी
नाचे राजा वनमाळी
कृष्णालागी यातना
द्याया आली पूतना
काळ तियेचा झाला ग
प्राण शोषुनी प्याला ग
तिला गाडली पाताळी
कालिया तो मातला
पाङ्मी त्यासी घातला
साती फणा तोडल्या
फासळ्या ग मोडल्या
नागाासी त्या निर्दाळी
ऐसा कान्हा यशवंत
तिन्ही लोकी बळवंत
गायी वत्से पाळतो
गोपासंगे खेळतो
सवंगड्यांशी सांभाळी
कालिंदीच्या काठाशी
पावा लावी ओठाशी
सूर वाजवी मोलाचे
कदंब-फांद्या आंदोळी