एक होता चिमणा एक होती चिमणी
नांदुरकीच्या झाडावर त्यांची झाली ओळख देख
चिमणा म्हणाला चिमणीला आपण बांधू घरटं एक
चिमणी काही बोलेना जाग्यावरची हालेना
चिमणा म्हणाला ‘‘येशील ना? माझी मैत्रिण होशील ना?’’
चिमणी म्हणाली भीतभीत ‘‘मला किनई पंख नाहीत’’
‘‘नसोत पंख नसले तर दोघे
मिळून बांधू घर’’
चिमणा गेला कामावर चिमणी बसली झाडावर
चिमणा आला झाडावर मिळकत घेउन स्वत:ची
एक कण धान्याचा एक काडी गवताची
काड्या काड्या सांधून घरटं काढलं बांधून
नांदुरकीच्या फांदीवर झुलूं लागलं सुंदरसं घर
एके दिवशी अघटित घडले चिमणीलाही पंख फुटले
चिमणा झाला राजा चिमणी झाली राणी
एक होता चिमणा एक होती चिमणी
गदिमा गौरव | Special Quotes
प्रा.रा.ग.जाधव
माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.