गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • बदलती नभाचे रंग कसे
  • Badalati Nabhanche Rang Kase
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बदलती नभाचे रंग कसे
    क्षणात निळसर, क्षणात लालसर, क्षण सोनेरी दिसे !
    अशा बदलत्या नभाखालती
    वसते अवनी सदा बदलती
    कळी कालची आज टपोरे फूल होऊनी हसे !
    मेघ मघा जे लवले माथी
    क्षणात झाले धार वाहती
    फूल कालचे फळ होउनिया भरले मधुर रसे

    !
    काल वाटले स्पर्श नच करू
    त्या कीटाचे होय पाखरू
    वेगवेगळे रंग तयाचे, इंद्रधनू उडतसे!


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems
गीतरामायण अॅप | GeetRamayan App
  • "गीतरामायण" आता ध्वनी व लिखित स्वरुपात गुगल प्ले/प्लेस्टोअर (Google Play/Play Store) वर अँड्रॉइड अॅप्लिकेशनच्या च्या स्वरुपात उपलब्ध आहे!.
    आजच डाऊनलोड करा

    GeetRamayan application now available on android phones,now enjoy geetramayan songs in audio and text on your mobile,for more details click on following link Download Link
  • Box-RB-1