गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
सोन्याची गट्टी फू
Sonyashi Gatti Fu
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
आल गट्टी
गाल गट्टी
सोन्याची गट्टी फू
तुला मी खेळात घेणार नाही
जेम गोळ्या देणार नाही
आलास तर घेईन गालगुच्चा,
अंगावर सोडीन भू.
पं गाडी, कुक गाडी
मामाघरची हम्मा गाडी
आम्ही सारे भूर जाऊ
एकटाच बस
जा तू
पप्पू, बिंटी, वेदा, राणी
आम्ही खेळू छप्पा पाणी
तूच एकटा बाथरूममध्ये
रडवे डोळे धू