गदिमा नवनित
  • मरण-कल्पनेशी थांबे तर्क जाणत्यांचा
    जरामरण यांतून कोण सुटला प्राणिजात?
    दु:खमुक्त जगला का रे कुणी जीवनांत?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • बाप रे बाप !
  • Baap Re Baap
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    उभ्या जगातील रबर
    एके जागी जमवले तर
    कारखान्यातले, दुकानातले
    बोटीत भरलेले, घराघरांत
    उरलेले
    जंगलाजंगलांतले,
    झाडाझाडांच्या खोडांतले
    बाप रे बाप !
    केव्हढा मोठ्ठा होईल तो साठा

    तेवढ्या सार्‍या रबराचा
    फुगा करावा एक प्रचंड
    आकाराचा,
    आवाज भरावेत त्या फुग्यांत
    गाड्यांचे, रणगाड्यांचे
    वीजांचे, वादळांचे
    मधमाशांच्या मोहळांचे
    कोसळणार्‍या जलांचे
    ओरडणार्या मुलांचे
    व्याख्यात्यांचे

    नेत्यांचे
    मास्तरांचे
    कोसळणार्या फत्तरांचे
    वाघ सिहाच्या डरकाळ्या,
    भूकंपातल्या किकाळ्या
    कानठळ्या बसवणारे
    भीती दाखवणारे
    सारे आवाज!

    तो फुगा केव्हढा फुगेल !
    आभाळाच्याही वर निघेल !
    जो जगङ्व्याळ फुगा
    मोकळी मोकळी बघून
    जागा
    फाटकन फोडा.

    बाप रे बाप !
    केवढा आवाज उमटेल
    अॅटमबॉम्ब फुटला -
    असेच जगाला वाटेल !


गदिमा गौरव | Special Quotes
  • प्रा.रा.ग.जाधव
    माडगूळकरांनी सात आठशे वर्षांची विविध रुपरसांची परंपरा आधुनिक संस्कारांनी पुन्हा सजीव केली आहे.चैत्रबन म्हणजे या पुराण्या काव्यपरंपरेचे एक कलाप्रदर्शनच आहे.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems