कोंबडीला आला टेलिफोन
तिनं विचारलं, ‘‘बोलतंय कोण ?’’
बोलत होता रावस मासा
तो म्हणाला, ‘‘सावध असा.
शेजारीच आहे मेजवानी
हिडू-बिडू नकाच कोणी.’’
कोंबडीनं फोन ठेवून दिला.
तिचा जीव घाबरुन गेला.
तेवढ्यात आली बकरीबाई
तिला काहीच ठाऊक नाही
कोंबडी गेली तिच्यापाशी
हळूच लागली कानाशी.
बकरी म्हणाली, ‘‘ऐका तरी
मेजवानी एक आहे खरी
पण पाहुणे आहेत शाकाहारी
मी बातमी काढलीय सारी.
गदिमा गौरव | Special Quotes
बा.भ.बोरकर
वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील
यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.