गदिमा नवनित
  • दोन ओंडक्यांची होते सागरांत भेट
    एक लाट तोडी दोघां, पुन्हा नाही गांठ
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • बाळा जो जो रे
  • Bala Jo Jo Re
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    बाळा जो जो रे
    पापणीच्या पंखांत झोपू दे डोळ्यांची पाखरे !

    झोपी गेल्या चिमण्या राघू
    चिमण्या राजा, नकोस जागू
    हिरव्या पानांवरी झोपली वेलींची लेकरे

    पुरे खेळणे आता बाळा
    थांबव चाळा, थांबव वाळा
    शब्द ऐकते झोपेमधुनी चाळवते वारे !

    मेघ पांढरे उशास घेउनी
    चंद्र तारका निजल्या गगनी
    वनदेवींनी उघडी केली स्वप्नांची मंदिरे !


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.भा.भावे
    'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems