चांद मोहरे, चांदणे झरे
झोपेतच गाली असा हससी का बरे
गगनातील नीलपरी
उतरूनिया भूमिवरी
उचलुनिया नेती तुला उंच काय रे ।।१।।
उंच उंच गगनी तुला
काय दिसे सांग मुला
दिसते का हळू विमान एक संचरे ।।२।।
बसुन आत कोण हसे
कुशल कुणी तरुण पुसे
खचित तेच प्राणनाथ सांगू काय रे ।।३।।
जाग जरा नीज सोड
पापा दे मजसि गोड
फिरून जाय लंघुनिया, सात अंबरे ।।४।।
गदिमा गौरव | Special Quotes
पु.भा.भावे
'मंतरलेल दिवस' वाचून झाले,मस्ती अजून आहे.यातल्या व्यक्ती,स्थळं,उगीचच पुनः पुन्हा डोळ्यांसमोर येतात.अस्वस्थ करतात.चांगलं काही वाचल्यानंतर हे असंच होतं.तीच त्यांच्या सामर्थ्याची पावती.शब्दाशब्दात सातारी मातीचा कस आहे.दुसरे काही बिघडले तरी माडगूळकरांचे आत्मकथनपर लिहिणे कधीही बिघडत नाही !.