गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
नीज माझ्या पाडसा
Nij Mazya Padasa
ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar
-
कुरवाळी तुज हलक्या हाते चांदाचा कवडसा
खिडकी वरती लाल डहाळी गुलमोहराची झुके
लाल पर्यांचे गीत तीवरी सळसळते सारखे
रातजागत्या वार्यासंगे सुगंध ये गोडसा
मिटुन पापण्या पहा लाडक्या, स्वप्नामधली पुरे
निळ्या धुक्याच्या इमारतींना बर्फाची गोपुरे
दारोदारी गुलाब लहडून उंच उभा माडसा
परीराणीच्या राज्यातच या
निजता जाती मुले
पंख होऊनी पर्यांस जडती पेंगुळलेली फुले
फुले मुले ती परत प्रभाती फुलती जगी राजसा