गदिमा नवनित
  • एकवार पंखावरुनी फिरो तुझा हात,
    शेवटचे घरटे माझे तुझ्या अंगणात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • सैनिक माझे नाव
  • Sainik Maze Nav
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    उभा पाठीशी सदैव माझ्या, तेजोमय इतिहास
    उभे पाठीशी प्रताप, शिवबा, उभे शौर्य विश्वास,
    उभे पाठीशी भगतसिगजी, उभे गुरू गोविद,
    उभा पाठीशी सुभाष योद्धा, गर्जतसे जयहिद
    या देशाचा मी संरक्षक
    भारत माझे गाव.... सैनिक माझे नाव

    मी न मराठी, राजस्थानी, धर्म जाती मम हिदुस्तानी
    मायभूमिचा मी अभिमानी, या अभिमानी धर्मव्रतांचा
    अवघ्या अंतर्भाव... सैनिक माझे नाव

    जननी माझी भारतमाता, या भूमीतच पिके वीरता
    जन्म-मृत्यूची मला न चिता, देह विनाशी, हा तर केवळ
    आत्म्याचा पेहेराव.... सैनिक माझे नाव

    जितेन आणि जगेन लोकी, रण क्रीडांगण माझ्या लेखी
    खड्ग पडो की मुकुट मस्तकी, देशकार्य ते देवकार्य मज
    अढळ अंतरी भाव.... सैनिक माझे नाव

    उरि निर्भयता, नयनी अग्नी, उन्नत मस्तक करी शतघ्नी
    उभा इथे मी असा निशिदिनी, बघू कोणता शत्रू करतो
    कुठूनी धीट उठाव.... सैनिक माझे नाव


गदिमा गौरव | Special Quotes
  • कविवर्य बा.भ.बोरकर:
    आदिकवी वाल्मीकीने आपल्या स्वतंत्र सौंदर्यदृष्टीने विधात्याच्या सूक्ष्म आणि स्थूल सृष्टीतून नेमके सौंदर्य टिपून काढून त्यातून आपली रामकथा रचली.त्याचप्रमाणे कविश्री माडगूळकरांनी वाल्मीकीच्या काव्यसृष्टीतले वेचीव सौंदर्य आपल्या स्चयंभू प्रतिभेने बिनचूकपणे निवडले आहे.गीतरामायणातली काही गीते रामायणासारखीच चिरंजीव होऊन राहतील आणि त्याचबरोबरच माडगूळकरांचे -माझ्या बंधुतुल्य मित्राचे-नाव देखील.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems