गदिमा नवनित
  • दहा ठिकाणी विरली माझ्या अंगीची पैरण
    कसा,कुठे टाका घालू,आणू कोठली नविन?
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • मातृवंदना
  • Matruvandana
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    दिला जन्म तू, विश्व हे दाविलेस
    किती कष्ट माये, सुखे साहिलेस,
    जिण्यालागी आकार माझ्या दिलास
    तुझ्या वंदितो माउली, पाउलांस.

    गुरु आद्य तू, माझिया जीवनात
    तुवा पेरिली धर्मबीजे मनात,
    प्रपंचात सत्पंथ तू दाविलास
    तुझ्या वंदितो माउली, पाउलांस.

    तुझा कीर्तिविस्तार माझा प्रपंच
    कृपेने तुझ्या रंगला रंगमंच,
    वठे भूमिका पाठ जैसा दिलास
    तुझ्या वंदितो माउली, पाउलांस.

    तुझे थोर संस्कार आचार झाले
    तुझे यत्नप्रामाण्य सिद्धीस गेले,
    तुझ्या चितने, लोभ पावे निरास
    तुझ्या वंदितो माउली, पाउलांस.

    उमेचे, रमेचे, तसे शारदेचे
    जपध्यान तैसे तुझे जन्मदेचे,
    तुझ्या प्रेरणेने यशस्वी प्रवास
    तुझ्या वंदितो माउली, पाउलांस.


गदिमा गौरव | Special Quotes
  • यशवंतराव चव्हाण
    गदिमांच्या काव्यप्रतिभेवर प्रसन्न होऊन..'मी जर राजा असतो तर कविवर्यांच्या हाती सोन्याचे कडं चढवलं असतं.'
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems