गदिमा नवनित
  • दिला जन्म तू,विश्व हे दाविलेस.किती कष्ट माये,सुखे साहिलेस,
    जिण्यालागि आकार माझ्या दिलास,तुझ्या वंदितो माउली,पाउलांस!
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • आम्ही भारतीय भगिनी
  • Amhi Bharatiya Bhagini
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    पिढ्यापिढ्यांच्या निर्भय आम्ही, भारतीय भगिनी
    घराघरांचे दुर्ग झुंजवू, झुंजू समरांगणी ।। धृ.।।
    आम्ही भारतीय भगिनी !

    अष्टभुजेच्या वंशज आम्ही, महिषासुर मारू
    देवत्वाच्या गुढ्या उभारू, दानव संहारू
    वलय होउनी वज्र नांदते, आमुच्या करकंकणी
    आम्ही भारतीय भगिनी !

    रणधीरांच्या सन्निध आम्हीस्फूर्तीसह राहू
    रथचक्राच्या आसाठायी घालू निजबाहू
    घडवू रामायणे, शत्रुचा मद उतरू रावणी
    आम्ही भारतीय भगिनी !

    शस्त्रही दिसते शोभून आमुच्या शोभिवंत हाती
    भौम मातता चारू त्याला सैन्यासह माती
    स्त्रीहट्टाच्या बळे बहरवू स्वर्गसुखे अंगणी
    आम्ही भारतीय भगिनी !

    रणयागांतरी सर्वस्वाच्या आहूती आम्ही टाकू
    अभिमन्यूच्या बसू रथावर, अश्वाते हाकू
    सती उत्तरेपरी आवरू डोळ्यांतील पाणी
    आम्ही भारतीय भगिनी !

    जिजा, अहिल्या, झाशीवाली आमुचीच रूपे
    सुताऽवतारे जितली युद्धे अमुच्या संतापे
    आ-शशितरणी स्वतंत्र राखू भारतीय धरणी
    आम्ही भारतीय भगिनी !


गदिमा गौरव | Special Quotes
  • पु.ल.देशपांडे:
    महाराष्ट्रावर आणि मराठी भाषेवर तर माडगूळकरांचे अनंत उपकार आहेत.इतर काहीही देण्यार्‍या माणसापेक्षा समाजाला गाणे देणार्‍या माणसाचे उपकार फार मोठे असतात.'Song has the longest life' अशी एक म्हण आहे.एक गाणे माणसांच्या पिढ्यानुपिढ्या बांधून ठेवते. एवढेच कशाला?.माणसाच्या मनाचे लहानमोठेपण ,रागव्देष घटकेत घालवुन टाकण्याचे गाण्याइतके दुसर्‍या कुठल्याही कलेत सामर्थ्य नसते.हजारो माणसे एक गाणे जेव्हा आनंदाने गातात त्या वेळेला त्या हजारांचे एक अंतःकरण होते.माडगूळकरांनी तर अशी शेकडो गाणी महाराष्ट्राला दिली.चित्रपटांना दिली, तमाशाच्या फडात, देवळात, शाळेत, तरुणांच्या मेळाव्यात, माजघरात, देवघरात, शेतामळ्यात, विव्दज्जनपरिषदेत...त्यांच्या गाण्याचा संचार नाही कुठे?.मराठी नाट्यसृष्टीत जी कामगिरी कै.देवलांनी केली,त्याच तोलामोलाचे कार्य माडगूळकर यांनी मराठी चित्रसृष्टीत केले आहे...म्हणूनच आम्ही सर्व माडगूळकर कलावंशाचे वारसदार ('Madgulkar Boys') आहोत,हे सांगायला मला अभिमान वाटतो.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems