गदिमा नवनित
  • कुंभारा सारखा गुरु नाही रे जगात
    वर घालितो धपाटा,आत आधाराचा हात.
मराठी युनिकोड फॉन्ट
गदिमांची बालगीते/बालकविता | Balgeete/Children Songs
  •  
  • Box-C-27
  • हे राष्ट्र देवतांचे
  • He Rashtra Devatanche
  • ग.दि.माडगूळकर(गदिमा) | Ga.Di.Madgulkar


  •  

    हे राष्ट्र देवतांचे, हे राष्ट्र प्रेषितांचे
    आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।धृ.।।

    कर्तव्यदक्ष भूमी, सीतारघूत्तमाची
    रामायणे घडावी, येथे पराक्रमाची
    शिर उंच उंच व्हावे, हिमवंत पर्वताचे
    आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।१।।

    येथे नसो निराशा, थोड्या पराभवाने
    पार्थास बोध केला, येथेच माधवाने
    हा देश स्तन्य प्याला, गीताख्य अमृताचे
    आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।२।।

    येथेच मेळ झाला, सामर्थ्य संयमाचा
    येथेच जन्म झाला, सिद्धार्थ गौतमाचा
    हे क्षेत्र पुण्यदायी, भगवान् तथागताचे
    आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।३।।

    हे राष्ट्र विक्रमाचे, हे राष्ट्र शांततेचे
    सत्यार्थ झुंज घ्यावी, या जागत्या प्रथेचे
    येथे शिव्रप्रतापी, नरसिह योग्यतेचे
    आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।४।।

    येथे परंपरांचा सन्मान नित्य आहे
    जनशासनातळींचा पायाच ‘सत्य’ आहे
    येथे सदा निनादो, जयगीत जागृताचे
    आचंद्रसूर्य नांदो, स्वातंत्र्य भारताचे ।।५।।


गदिमा गौरव | Special Quotes
  • बा.भ.बोरकर
    वस्तुत: माडगूळकरांचे गीतरामायण प्रभूरामचंद्र सिंहासनस्थ झाल्यावर सुरनरांच्या जयजयकारांत संपते. पण माडगूळकरांची प्रतिभा ते तिथे संपवित नाहीत...छंद आणि स्वर विराम पावले तरी तिचे तेज सरणारे दु:ख आपल्या अंतरात रेंगाळतच रहाते.यथाकाळ या रामायणाने पुन्हा नवा अवतार घ्यावा म्हणूनच तर त्यांच्या हातुन हे घडले नसेल?एवढे मात्र खास की तोपर्यंत आणि त्यानंतर देखील यातील काही गीते गीतरामायणासारखी चिरंजीव होऊन राहतील आणि त्या बरोबरच माडगूळकरांचे-माझ्या बंधुतुल्य मित्राचे नाव देखील!.
संबंधीत गाणी-कविता | Related Songs-Poems